"भिजु दे रंग आणि अंग
अखंड उठु दे रंग -तरंग,
व्हावे अवघे जीवन दंग
असे उडवू आज हे रंग। "
भारत हा सणांचा देश आहे . येथे अनेक धर्मांचा मेळा 2पाहावयास मिळतो . विविध धर्मांच्या , विविध सणांमुळे , येथे सणांची रेल -चेल असते . या पैकी प्रत्येक सणाचे वेगवेगळे आकर्षण आहे . दिवाळीचा सण प्रकाशाचे , तसेच दसरा चांगल्याचा वाईटावर विजयाचे प्रतीक दर्शवितात . असेच होळी नव्या उत्साहाच्या जन्माचे प्रतीक आहे .
वसंत ऋतुचे आगमन होळीच्या सणाने होते . निसर्ग आपले नवीन वस्त्र घालून वसंताच्या आगमनाची तयारी करत . वसंत येताच साऱ्या देशात होळीचा जल्लोष चढलेला असतो .
होळीच्या सणाची एक पौराणिक कथा आहे . हिरण्यकश्यपु नावाच्या राजाने आपल्या मुलाला मारण्यास होलिका म्हणजेज त्यांच्या बहिणीला पाठवले . हिरण्यकश्यपूच्या मुलाचे नाव प्रल्हाद . प्रल्हाद हा अत्यंत प्रेमळ , देवभक्त मुलगा होता . त्याच्या आईने त्याला गर्भात असतानाच नारदांचे प्रवचन ऐकवले ज्यामुळे त्याचे गर्भ-संस्कार झाले . प्रल्हाद हा विष्णुभक्त होता जे त्याच्या वडिलांना अमान्य होते. होलिकेला आगीमध्ये न जाळण्याचे वरदान होते. जेव्हा ती प्रल्हादाला मारण्यास आगीमध्ये बसली तेव्हा ती भस्म झाली . देवाने आपल्या भक्ताचे संरक्षण केले .
होळीच्या दिवशी कुटुंब मिळून आपले घर केर-कचऱ्याने मुक्त करतात , होळीच्या पौर्णिमेच्या रात्री लोक सुके लाकूड गोळा करून एकत्र करून पेटवून होळीचा सण साजरा करतात . या प्रज्वलित होळी मध्ये लोक हळद , कुंकू व तांदूळ वाहतात . नारळ वाहायची प्रथा देखील आहे . या सणात घरात गोड - धोडीची रेलचेल असते .
सणाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेज रंगपंचमीला गुलाल उधळला जातो . चेहरे रंगाने माखले जातात . अंग पाण्याने भिजतात . होळी ला आपण "रंगाची दिवाळी " असे ही म्हणू शकतो . अनेक कवी आपल्या गोड भाषेत या रंगपंचमीचे वर्णन करतात . चित्रकारांना या सणाचे फार कौतुक असते . या सणाला आपल्या चित्रात कसे अभूतपूर्वक बनवावे यात त्यांचा रोमांच असे .
पिचकारीचे पाणी अन रंगांची गाणी ....
रंगपंचमीच्या सणाची
अशी अनोखी कहाणी .....
अशा या होळीच्या सणाची अविस्मरणीय आठवण कोण एका वर्षात विसरेल ?
रंगात रंगले रंग , हर्षात फुलले मन !!!